आम्ही स्वर्ग नाही पाहिला

आम्ही स्वर्ग नाही पाहिला 

 

कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक करताना

 जमिनीवर ताऱ्यांच्या भास झाला

 शत्रूशी दोन हात करताना

 गड आला पण सिंह गेला। 

 देव टाक्यांच पाणी पिताना जणू अमृताचा भास झाला

कल्याण दरवाजातून सूर्योदय पाहताना मनात एक विचार आला,

आम्ही स्वर्ग नाही पहिला पण आम्ही *सिंहगड* पाहिला  ।।१।।

 

         गडांचा गड अस म्हणवता राजियांचा गड झाला ।   

      चोर दरवाजातून प्रवेश करताना 

        मावळा असल्याचा भास झाला ।

                     सुवेळा,पद्मावती,संजीवनी करताना बालेकिल्ला सर झाला ।।

        नेद्यातला सांज वारा अंगी शहरताना 

 एक विचार मनामध्ये आला,

        आम्ही स्वर्ग नाही पहिला पण आम्ही *राजगड* पाहिला  ।।।२।।

 

       साक्षात जगदीश्वर साक्षी असताना दुर्ग दुर्ग दुर्गेश्वर झाला ।

  राजधानी चा गड बांधताना हिरोजी आमचा मोठा झाला ।

  वाघ्याची छवी पाहताना निष्ठेनं ऊर भरून आला ।

 भवानी कड्यावरून लिंगाणा  पाहताना 

एक विचार मनामध्ये आला , 

         आम्ही स्वर्ग नाही पहिला पण आम्ही *रायगड* पाहिला  ।।३।। 

 

 चंद्राच्या प्रकाशात वाट शोधताना

 काजव्यांचा आधार झाला।

 तारामतीचं सौंदर्य पाहताना जगताचा विसर पडला ।

 ढगात गडलेलं इंद्रवज्र पाहताना जणू स्वर्गाचा च भास झाला।

     कोकण कड्यावरून सूर्यास्त पाहताना

 एक विचार मनामध्ये आला ,

आम्ही स्वर्ग नाही पहिला पण आम्ही *हरिश्चंद्र गड* पाहिला  ।।४।।    

 

  सिंहगडाची श्रीमंती पाहताना स्वर्गाच्या श्रीमंतीचा भास झाला ।

 राजगडाची भव्यता पाहताना स्वर्गाच्या भव्यतेचा भास झाला,

 सह्याद्रीच्या या खोऱ्यात भटकताना जणू स्वर्गाचा च भास झाला ।

 रायगडी मेघडंबरीतल्या राजाला पाहताना एक विचार मनामध्ये आला,

 आम्ही स्वर्ग नाही पहिला पण  आम्ही आमचा *राजा* पाहिला  ।।५।।

 

-Pratik Inamdar ( Founder Audacious Hikers )